पोह्याचं ताकात कालवलेलं डांगर

पोह्याचं ताकात कालवलेलं डांगर, बाजूला तेल आणि ताक

Poha Dangar

ह्याला खादाड बुदलेपणा म्हणतात .लहानपणापासूनच मी ‘ खादाडबुदली ‘.आज्जी चा शब्द.आवडत्या पदार्थाचं नुसतं नाव जरी घेतलं ना तरी तोंडाला पाणी सुटतं आणि मग तो पदार्थ केल्याशिवाय आणि गिळल्या शिवाय पोटाला,जिभेला ,आत्म्याला शांतताच नाही मिळत.आजची ही तीच गत .आत्ता समूहावर गौरी जोशींचा thread चालू होता त्यात मीच comment मधे मऊभात ie आटवल आणि पोह्याच्या डांगराचा उल्लेख केला आणि काय विचारता लगेच fridge मधून डांगर पावडरीची पिशवी बाहेर आली ,ताकाचा तांब्या बाहेर आला ,ताकात डांगर कालवून झालं ,फोटो घेतला ,postat आहे आत्ता ,जमेल तेवढं लिहितेय I mean typatey ,as डाव्या हाताने typing चालू आहे ,एकीकडे डांगराची गोळी तोडांत टाकतेय तेलात बुडवून तीला आंघोळ घालणं चालू आहे ,तोंडात गेली की हायहुय चालू आहे कारण एकतर अचरटासारखं मी नुसतंच खातेय एरवी आटवल ,दहीभात असतो बाजूला पण आज न्याहरीलाच पोळी भाजी आणि late bfast मग आत्ता मी एकटीच असते दुपारी आणि भूक ही नाही विशेष .पण भूक नसतानाही खादाडबुदलीला खावसं नाही वाटलं तर नवलंच.ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी करते त्या नवर्याच्या भाषेत आचरटपणात मोडतात .

म्हणून मी त्या त्याच्या अपरोक्ष करते बर्याचदा ,आणि तरीही त्याला कळतातच कारण बर्याचदा त्याचे after effects like acidity ,पोट दुखणं हे त्याच्या समोर घडतं मग त्यालाच घरगुती उपाय करावे लागतात माझ्यावर ,मग त्याची मनाला लागणारी ,बोचणारी बोलणी ही खाते ,सोसते बापडी ,आणि दोन दिवस जेमतेम जातात मधे की पुन्हा ,’ ये रे माझ्या मागल्या ‘ .त्याचं office ला जाणं ,कि मग मालकाला मालक कोण ? मीच माझ्या किचन ची राणी हो ,,,,म्हणजे तो असतानाही मीच राणी पण राजाचा ही वावर असला कि लक्ष असतं ना त्याचं ,,,तो कामावर गेला की मैदान मोकळं .हायहूय …झणझणीत डांगर ,,,आता जरा ताक पिते आणि शांत झाला जीव की निजते जराशी .वामकुक्षी .आता असं अचरटासारखं खाल्लं की वेळी अवेळी भूक लागते ,3 वाजता भूक लागेल मला परत ,,,मग ,,,,? मग मघा शिव मेढेंची घावनाची post बघितली .बर्याच दिवसात झाली नाहीयेत आणि जीभेला ,पोटाला ,आत्म्याला,खादाडबुदलीला ती बोलावतायत,आता कोल्हापूरला जाऊन आयती मिळणं practicleनाही so करीन म्हणते बापडी खादाडबुदली .रात्री नवर्याची बोलणी ही खाईन ,थोडं कमी लागेल असं तो बोलावा म्हणून जरा साग्रसंगीत स्वयंपाक करीन ,पौष्टीक आणि चांगलासा ,मी असंही खाते हे दाखावयला आणि त्याला जेवणाच्या वेळेस ,एखाद डांगराची लाटी लागेल तेवहढीच खावी म्हणेल तेव्हढीच  ठीक असते खाणं असंही म्हणेल  ,हे सगळं ऐकेन तेव्हा,ठेवेन जपून त्याच्यासाठी एखादी लाटी माझ्यापासूनच लपवून .

पोह्याचं डांगर पाककृती ……..पोहे पातळ वा जाड कुठलेही कोरडे भाजून घेणेजाड पोहे भाजायला वेळ लागतो म्हणून पातळ बरे  .त्यात तिखट ,मीठ ,हिंगं आणि main पापडखार 5 to 10 grm only.असे सगळे घालून mixer वर पावडर करून घेणे .आयत्यावेस खायच्यावेळेस त्यात ताक घालून मळून घेणे ,तेलाचा हात लावणे मळताना .ह्याचेच पापड व मिरगुंडं होतात तेव्हा मात्र डांगर कुटून घ्यावे लागते .नुसतं खायला मळून ,गोळ्या,लाट्या केल्या तरी चालतात.कुटायची गरज नाही .हिरव्या मिरच्या घालायच्या झाल्यास पावडर करताना तिखट न घालता आयत्या वेळेस जिरं मिरची वाटून घालावी आणि मग ताकाने मळावे.पापड करायचे झाल्यास टिकण्याच्या दृष्टीने ताकाऐवजी पाण्यातही मळतात.पण ताकातलेही पापड करतात ,ते जास्तं टिकत नाहीत .

Janhavi Prashant Marathe is a member of the Angat Pangat Facebook Group.

No Comments Yet

Leave a Reply

Your email address will not be published.