कारल्याची नारळाच्या दुधातली आमटी

दिवाळी पंगत साठी काय recipe द्यावी ह्या विचाराने कालची रात्र झोप नाही .विचारांचा आणि अनेक recipes चा मनात कल्लोळ होत होता.आणि अचानक आज्जीची कारल्याची आमटी आणि तीचा दिवाळीशी असलेला संबंध आठवला ,शिवाय आपल्या theme मधे ही ती perfect बसते ,lesser known recipe म्हणून हीच recipe दिवाळी पंगत करता मी निवडली .

आमच्याकडे ,म्हणजे बाक्रे कुटुंबातली ,कुटुंबाची(माझ्या आजोळची )  ही आज्जीची  खास recipe .आज्जी असे पर्यंत आमच्याकडे तीन पिढ्यांची भाऊबीज व्हायची .आजीचे भाऊ,आईचे भाऊ म्हणजे माझे मामा आणि  आणि आम्ही आत्ते मामे  भावंडं ,मिळून 25 एक जण.दर वर्षीचा बेत ठरलेला ,मटकी उसळ,कारल्याची आमटी,लाल भोपळ्याची खीर,मुग डाळ भजी,चटणी ,कोशिंबीर ,पोळ्या,वरण ,भात .माझ्या मामे आजोबांपासून ते आम्हा नातवंडांपर्यंत सगळ्यांचा हा सगळा आवडता मेन्यू.भाऊबीज दिवाळीचा शेवटचा दिवस ,चार दिवस गोडाधोडाचं खाऊन जीभेला जरा चवीत बदल हवा असतो सगळ्यांना ,शिवाय जसं गुढी पाडव्याला म्हणजे हिंदू वर्षाच्या सुरुवातीला आपल्याकडे दिवसाची सुरुवात आपण मुद्दाम कडूलिंबाच्या(  जिरं मिरं साखर मीठ घालून केलेल्या )चटणी ने करतो ,त्या मागंचं कारण हेच की नववर्षाची सुरुवात कडू ने केली की पुढचं वर्ष गोडाचं जाऊदे ,कोकणात आमच्या कुडाळात दिवाळीच्या पहिल्या दिवशी सातविणीच्या झाडाच्या  ( वृक्षच ) खोडाची साल काढून ,धुवून ती ताकात उगाळून प्रत्येकाने चमचाभर तरी प्यायची ,पहिल्या पहाटेला,नर्क चतुर्दशीला अशी प्रथा आहे ,कडू लागतं ठार  पण एक छान सुवास असतो त्याला ,त्यामागचं कारण ही तेच सणाची सुरुवात कडू चवीने केली की सण गोड जाणार ,शिवाय पोटातील कृमी मारण्यास ह्या औषधी गुणधर्म असलेल्या सातविणीच्या खोडाचा उपयोग होतो ,पुढचे सणाचे चार दिवस गोड,तळणी चरायची असते आपल्याला ,पोट बिघडू नये त्यावर उत्तम उपाय असतो हा .मुंबईत मी राहते तिथे माझ्या नशिबाने आणि देव दयेने ,निसर्ग कृपेने भरपूर त्या मानाने झाडं झुडुपं आहेत आणि त्यात सातविणीचं झाड ही जवळ च आहे ,so आम्ही ही प्रथा इथे ही follow करतो ,पण हे गेले 20 वर्ष ,मी या society त रहायला आल्या पासनं ,त्या आधी नव्हतं जमत in मुंबईत .नव्हतच सातविणीचं झाड आजूबाजूला  .असो.तर असंच  आपण सणावारी दिवाळीत इतकालं गोडाचं खतो तर त्यात एक कडू रस ही पोटात जाऊदे ,म्हणून आज्जी कारल्याची  पंचामृती  चव असलेली नारळाच्या दुधातली ही आमटी करायची आणि आम्ही सगळेच तीवर ताव मारायचो .

आज्जी चं माहेर ,सासर कोकणातलं ( माहेर सावंतवाडी ,सासर कुडाळ) ,त्यामुळे नारळ ,काजूवर भरपूर हात ,पण इतकी गुणी पिढी ना ही ,मुंबईत आजोबा नोकरी साठी आले आणि पाच मुलांना घेऊन गिरगावातल्या एका खोलीत आजीने संसार थाटला , ,( आठ मुलं झाली होती तीला ,तीन गेली त्यातली म्हणून पाच ),तेव्हा मुंबईत नारळ वगैरे  विकत घ्यावे लागत ,खर्च वाढणार ,काजू तर विचार करायचा नाही विकत घ्यायचा  ,,पण हाताला तर सवय इतकी ,मग ती एक शक्कल लढवायची नारळ घालायचा पण थोडा घालूनही तो भरपूर घातलाय असं खाणार्याला वाटलं पाहिजे ,यासाठी ती थोडा चव घालायची कुठल्याही भाजी ,आमटीला ,आणि थोड्याचं म्हणजे अगदी दोन चमचे नारळाच्या चवाचं पंच्याच्या फडक्यात वा गाळण्यात तो चव घेऊन त्यावर कोमट पाणी घालून दूध काढायची आणि शेवटी ती तो आंगरस वरून भाजी ,आमटीला घालायची आणि बिचारी पुरवून पुरवून नारळ वापरायची आणि तरी देखील प्रत्येक भाजी,आमटी तीची अमृता सारखी व्हायची .माझ्या ह्याची डोळा याचि देही याची जिभी आणि याची पोटी ,मी हे अनुभवलंय माझ्या वयाच्या तिशीपर्यंत .काजूच्या ठिकाणी तीने दाणे वापरले तरी पदार्थ शाहीच होत असे.

माझ्या बाळंतपणाच्या वेळेस आजीच होती माझ्याजवळ ,माझ्यासाठी बदामाच्या वड्या ,डिंकाचे लाडू करून ठेवले होते तीने .काय व्हायचं मला बघायला ,बाळाला बघायला नातेवाईक यायचे ,मी काय करायचे आल्या गेल्याला हातावर आजीने माझ्यासाठी  केलेल्या बदामाच्या वड्या द्यायचे ,दोन दिवसात वड्या  संपायच्या ,मग डिंकाचे  लाडू  पुढे करायचे ,आजीच्या हे लक्षात आलं आणि तीने मला एकदा समजावलं ,बाळ तू आल्या गेल्याला नुसतं पाठवत नाहीस ,हे सगळं ठीक आहे पण आत्ता तुझ्या पोटात बदाम ,डिंकं ,खसखस जायला हवं म्हणून नवर्याने  तुझ्या एवहढा खर्च करून मला सगळं आणून दिलं आणि मी तुझ्यासाठी सगळं केलंय ,तेव्हा आत्ता आधि ते तुझ्या पोटात जाऊदे ,येणार्या जाणार्या पाहुण्यांना मी चिवडा ,लाडू करून ठेवते आता वेगळा  तो पुढे कर ,असं म्हणून तीने किलो किलोचा चिवडा ,लाडू तीच्या 80 व्या वर्षी केलान.ही तिची माझ्यासाठीची ओढ,काटकसरची शिकवण .म्हणाली आत्ता तुमचा नविन संसार ,नवरा एकटा कमवतोय तेव्हा खर्च जपून करायला हवा .एकदा का बस्तान बसलं ,की मग  वाटत बस बदामाच्या वड्या पै पाहुण्यांना माझं काही म्हणंणं नाही .
नंतर परत माझ्याकडे आली होती तेव्हा माझ्याकडे दुसर्या दिवशी श्रावणी शुक्रवारची सवाष्ण सांगितली होती,आदल्या दिवशी संध्याकाळी आजीने पुरणपोळीचा बेत आखला आधीच करून ठेऊ म्हणजे सकाळी बाकीच्या स्वंयपाकाला वेळ मिळेल म्हणाली  आणि पुरण शिजलं ,मला ही from scratch मी मोठी झाल्यावर ,पुरणपोळी आजीची बघायचीच होती ,मी निरखत होते जमेल तेवंढं as मधे मधे माझं बाळ संभाळत जमेल तसं ,आजीची पहिली पोळी जेमतेम मी बघतेय टम्मं फुगताना तोच मन्याने माझ्या ठो ठो रडायला सुरुवात केली ,काही केल्या थांबेचना ,आजीच्या इथे पोळया बिघडायला लागल्या ,तीने गॅस चक्कं तिसर्या पोळी नंतर बंद केला ,म्हणाली पिंके आधी उचल बाळाला आणि dr कडे ने ,तो सारखा कानाला हात लावतोय ,कान दुखत असेल तोवर तिची मन्याची दृष्टं वगैरे काढून झाली होती .घरगुती उपाय ही झाले होते करून पण रडणं थांबत नव्हतं त्याचं मग मी गेले  dr लगेच तीच्याच सांगण्यानुसार ,खरंच कान आतून लाल झाला होता ,dr ने औषध दिलं ,मी घरी आले ,मन्या रडायचा थांबला होता त्याला दूध पाजून निजवला म्हणाली अगं आमच्या वेळेस dr वगैरे नव्हते ,उपचार वेळीच व्हायचे नाहीत आता तुम्हाला सोयी आहेत उपलब्ध तर थांबायचं कशाला ,माझी पहिली मुलं उपचारा अभावी,,,,,,,असं अर्धवट  वाक्य सोडून पदर लावलान डोळ्यांना ,,,माझ्या आलं लक्षात सगळं  .मी विषय बदलून आजीला म्हटलं चल आजी पुरणपोळी करुयात आता तशी आजी म्हणाली तू दमलीयेस आता ,प्रशांत ( नवरा ) ही office मधून दमून येईल मी खिचडी टाकते ती जेवा आणि निजा ,पुरणपोळ्यांचं मी बघते काय ते .आम्ही जेवलो आणि निजलो जाऊन ,सकाळी 7 वाजता जाग आली तो आजीच्या 25 पुरण पोळ्या झालेल्या होत्या .मी म्हटंलं अगं तू केल्यास तरी कधी तर म्हणाली ,3 वाजता जाग आली आणि आंघोळ करून केल्या झालं .म्हंटलं धन्य आहेस .पण खरं सांगू ही आजीची सवय ही  थोडी का असेना तीच्याच कृपेने उतरलीये माझ्यात .मी हा लेख आत्ता पहाटे 4.30 ला बसलेय लिहीयला .झोप नाही लागली ,उठले ,डोक्यात आठवणी साठल्या होत्या त्या आधि लेखाच्या स्वरूपात लिहायला बसले ,लिहीता लिहीता डोळे पाणावले ,पाण्याने भरलेल्या डोळ्यात नीट दिसत ही नाहीयेत अक्षरं for typing ,तेव्हा आता लेखणी थांबवते ,आणि कारल्याची आमटी करायला घेते पहाटे 5.30 वाजताच .आज नवर्याला उठला की surprise 7 वाजता आमटी तयार मिळेल त्याला ,,माझ्या लग्नानंतर नवर्याला ,आणि माझ्या सासू सासर्यानां  सगळ्यांना ही आमटी खूप आवडली मी जेव्हा प्रथम त्यांना खाऊ घातली ,मग वरचेवर करतच आले .माझ्या बाबांनाही आवडायची ,आता ना बाबा ,ना सासू सासरे…असो. आज  breakfast लाच गरम पोळ्या आणि पंचामृती कारल्याची आमटी ,ही आमटी रात्रीपर्यंत तर अधिकच मुरेल आणि मस्तंलागेल अधिक   मग नवरा  office मधून आला की रात्री गरम गरम वाफाळलेला भात ,कारल्याची आमटी, वरून तूपाची धार ,आणि आजीच्या आठवणीं सोबत आम्ही जेवू तिला मनोमन वंदू .

ह्या वेळेस प्रथमच आधि लिहीतेय आणि ,मग recipe करणार आहे आणि मग फोटू घेणार आहे मंडळी .दिवाळी पंगत अंकासाठी हो सगळा हा प्रपंचं आजीच्या लाडक्या  खादाडबुधलीचा.अरे हो recipe लिहायची आहे अजून ……..ती अशी:

Bittergourd and Coconut Milk Amti

कारल्याची नारळाच्या दुधातली आमटी 
एक मोठ्ठं वा दोन मध्मम कारली .मधे चिरून बीया काढून घेणे ,आणि काचर्यांना करतो तशा अर्ध चंद्राकृती चकत्या करून घेणे ,त्याला मीठ लावून ठेवणे .वर झाकण ठेवायचं .15,20 मिनिटं ठेवणे ,त्या वेळात एका नारळाचं दूध काढायचं .शक्यतो first extract and 2nd extract वेगवेगळा ठेवायचा .आता पातेल्यात फोडणीस लागेल त्यापेक्षा किंचीत जास्तं तेल घेणे ,त्यात 10,12 दाणे मेथीचे ,8,10 काजू , नसतील तर आजी ,12,15 शेंगदाणे घ्यायची ,हिंग,हळद असं तळून घेऊन त्याची  पाट्यावर वर थोडं पाणी घालून गंधा सारखी गुळगुळीत गोळी  करून घ्यायची (आजीचे  शब्द ) ( आपण अर्थात् mixer वर वाटायचं ) .मग मीठ लावलेल्या कारल्याच्या चकत्या जरा पिळून घेऊन पातेल्यातील तेलात खरपूस तळून घ्यायच्या ,बाजूला काढायच्या ,आता तेल कमी वाटलं झालंय असं तर थोडं घालायचं इथे पातेलं बदलंलं तर अधिक बरं ,नविन तेल घेऊन ( तूप ही छान लागतं इथे ) ,नेहमीसारखी फोडणी ,मोहरी,जिरं, हिंगं ,हळद, ( हळद ,हिंगं नावालाच इथे as आपण मेथी काजू तळताना ही ते घातलंयं )  लाल तिखट ,कडिपत्ता अशी ,फोडणी झाली की पाणी घालायचं तीत आणि मग ऊकळी यायला लागताच त्यात तळलेल्या कारल्याच्या चकत्या,ती मघा तळून  वाटलेली मेथी ,काजू ,हिंगं ,हळदीची paste ,( गंधासारखी गुळगुळीत ) चवी नुसार मीठ,गूळ ,चिंचं लिंबाएवढी ( चवीनुसार )
असं सगळं घालून ,छान mix करून ऊकळी आणणे ,मग गॅस एकदम मंदं करायचा ,आणि आधी 2nd extract म्हणजे पातळ दूध नारळाचं आणि  मग 1st extract ,ie घट्टं वालं नारळाचं दूध हळूहळू सारखं ढवळत राहून घालायचं नी लगेच गॅस बंद करायचा .घट्टंवालं म्हणजे 1st extract घातल्यावर जास्तं उकळवू नये .आणि  वर झाकण ही नाही ठेवायचं .फाटण्याची शक्यता असते म्हणून सांभाळायची तंत्रे. काजू मुळे ,नारळाच्या दुधामुळे creaminess ,richness येतो आमटीला ,चिंचं गूळ ,कारली यांमुळे पंचामृती चव येते .दाटसरपणा असतो या  आमटीला, त्यामुळे पोळी,गरम भात कशाबरोबरही छान लागते हि आमटी .

दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मंडळी ,आता आमटी करायला जाते ,फोटू काढून लेखा – सहित post करते.हा उलटा घास प्रथमच घेतेय पण आज्जी special आणि दिवाळी special असल्याने तो चवीष्टंच असणार ,शिवाय आपल्या अंगत पंगत समूहासाठी आहे so आपणा सगळ्यांचा स्नेह ,लोभ,आशिर्वाद ही माझ्याबरोबर आहेतच ,so उलटा काय नि सुलटा काय ,no tension at all .

Janhavi Prashant Marathe is a member of the Angat Pangat Facebook Group.

No Comments Yet

Leave a Reply

Your email address will not be published.