जिलबी

जिलबी करून बघायची
हौस होती मला कधीची
पण दही-तूप न वापरता
चविष्ट कशी हो करतां ?
नेटवरून रेसिपी काढली
केली त्यात थोडी बदली
घाल पाणी, घाल पीठ
घालू का कणभर मीठ?
कसे हो जमते हलवायाला
फडक्याने पीठ घालायला ?
बोण्डे, नुक्त्या, बुंदी पडल्या
पडेनात पण गोल जिलब्या
करताकरता समजलं बाई
जिलबी काही सरळ नाई
कधी सोप्पी कधी फरेबी
अनेक तिच्या ह्या लकबी
पण मीही ठरवलं मनाशी
बघू तरी होत नाही कशी
चोवीस तास कैदेत ठेवून
घेतला मैदा थोडा आंबवून
तांदूळ आणि उडीद पिठी
मैद्यांस मारी घट्ट मिठी
केशर गूळ- साखर पाक
लिंबू देई झक्क झाक
गरम तेलात धरली धार
दोन वळी अन एक तार
आंबट, गोड, कुरकुरीत
रसाळ, गोल -गरगरीत
जमली एकदाची जिलबी
बाई जमली मला जिलबी
-Shruti Nargundkar

No Comments Yet

Leave a Reply

Your email address will not be published.