The power of the “तोंडी लावणं”

तसं बघायला तोंडी लावणं ही डावी कडची बाजू ,आहारशास्त्रानुसार आपल्या पानातील डावीकडची बाजू ही उजवी कडच्या पौष्टीक ऊसळी ,हिरव्या भाज्या यांच्या पेक्षा कमीच वाढली जाते आणि ती कमीच खायची असते ,कोशिंबीर वगळता ती डावीकडे जरी वाढली जात असली तरी भरपूर खावी ,चार वेळा घ्यावी हवी तर ,पण वाढताना तीचं प्रमाण ,portion भाजीच्या तुलनेत कमी असतं .बाकी चटणी ,लोणची ,हे अगदी ठिपका ठिपकाच वाढलं जातं ,पापड ही एखाद च वाढला जातो ,ह्याचं कारण पानात गर्दी होऊ नये एवढंच नसून ते खरतर जास्त खाऊ नये ,चवी पुरतंच घ्यावं ,तोंडी लावणं म्हणून मधे मधे असं आहारशास्त्र सांगतं आणि ते योग्यच आहे ,लोणची पापडात मीठाचं प्रमाण ,चटणीत मिरची चं पऽमाण बघता ते कमी पऽमाणात खाणं च इष्ट .पण,,,,,,,,,हे जरी खरं असलं तरी हे ही तितकच खरं आहे कि ह्या शिवाय आपलं पान हलत नाही .म्हणजे सणावाराचं वा लग्ना ,मुंजीचं कार्याचं जेवण असो  असो वा अगदी रोजचं घरगुती साधं जेवण असो ,तोंडी लावणं डावीकडचं असलं तरी त्याचं आपल्या पानातलं स्थान अबाधित आहे.डावीकडचं म्हणून त्याचं महत्व कमी अजिबात नाही .

पंचपक्वान्नांच्या पानात तर ते असं काही साथ देतं विशेषतः खवय्याला ,जिलबीचं जेवण असो वा श्रीखंड पुरीचा बेत असो वा बासुंदी असो अशा बेतांच्या वेळी,तोंडी लावायला डावीकडचं करकरीत कैरीचं ताजं लोणचं असो वा मुरलेलं लोणचं असो ,ओल्या नारळाची लिंबू पिळलेली हिरवी मिरची ,कोंथिंबीर घातलेली जरा खरबरीत चवीष्ट चटणी असली ना डावीकडे की खवय्याला ,आणि खाणार्याला चार जिलब्या जासेत जातात,वाटीभर बासुंदी सहज जास्त रिचवली जाते,श्रीखंड अंमळ जास्तंच बोटं चाटलं जातं ही fact आहे कारण गोडाच्या चवीला break देण्याचं काम ही तोंडी लावणी चोख करतात आणि त्याने  सार्याच पदार्थांची चव द्विगुणित करतात .

आमच्याकडे माझे बाबा खवय्ये आणि तब्येतीत खाणारे ,म्हणजे पैज लावून खाणार्यांपैकी ,40-40 गुलाबजाम, 50 एक जिलब्या, 25 एक लाडू असं पंगतीला खाताना मी बघितलंय त्यांना,आता असंच आमच्या मराठ्यांकडे ही माझा नवरा ,पालीचे चुलत दिर ,आत्ते दिर ही सगळी मंडळी ही अशीच पैजा लावून पंगतीत जेवणारी…काय मज्जा येते अशांना वाढायला ,आग्रह करायला म्हणून सांगू …I miss my baba sometimes… असो . तर अशा मंडळीना ही तोंडी लावणी ही व्यवस्थित लागतात म्हणजे चविष्ट तर हवीतच पण भरपूर प्रमाणात ही हवीत portion wise , तर मग खरा न्याय देता येतो त्यांना गोडाला .माझा नवरा ही अगदी एक एक किलो श्रीखडं पंक्तीत एकट्याने संपवतो ,मोदकाच्या वेळी 15 ते 20 मोदक बाकीच्या पानातील गोष्टींसहीत सहज खातो ,म्हणजे वरण भात असो ,भाजी ,आमटी असो वा चटणी ,कोशिबीर सगळंच भरपूर प्रमाणात , and I love that …माझीच मेलीची दृष्ट नको हो लागायला माझ्या नवर्याला ,तर अशांना ना ही तोंडी लावणी  लागतातच . like माझे बाबा ना ताकाचा भुरका घ्यायचेच मागचा दहीभात कालवताना , I still remember, आणि शेवटी ताक पिताना डावीकडची नारळाची चटणी चिमटीत घेऊन ती ताकाला लावायचे आणि प्यायचे , 25-30 लाडू वा जिलबी वा मोदक रिचवल्यावर वा श्रीखंड बासुंदीच्या 10-12 वाट्या रिचवल्यावर त्यांच्या गोडाच्या चवीला तो रुचीपालट व्हायचा ,असं म्हणायचे …same त्यांचा जावई ( माझा नवरा ) . त्याला ही लोणचं ,चटणी भरपूर लागतं ,असा बेत असेल की हं ,एरवी कमी चालतं .

माझ्या सारख्या खादाडबुधलीचं तर रोजचं पान ही हलत नाही ,,मी काय quantity नी ह्या लोकांसारखं पैजा वगैरं लावून नाही जेवू शकत ,प्रांतच नाही आपला तो ,,पण आहेत हं अशा बायकाही ,मी बघितल्या आहेत ,आणि त्यांचं खरंच कौतुक आहे .तर सांगायचा मुद्दा हा की पक्वांन्नांचं जेवण असो वा श्रमपरिहाराचं असो वा रोजचं असो ,तोंडी लावणं छान असेल ना तर जेवण छान जातं ,बहार येते  ही fact आहे.

गेले नऊ दिवस गोडा धोडाचं खाणं सतत चालू होतं plus धावपळ ,आरतीची ,गरब्याची ,साड्या ,दागिने matching  ह्यांव नी त्यांव त्या मुळे श्रम ही झाले खूप मग आजचा माझा श्रमपरिहाराचा स्वयंपाक .

काही नाही मी सरळ दोन तोंडीलावणीच केली झटपट एक उडदांचं कांदा ,दही मिरची घालून डांगर कालवलं आणि दुसरी नारळाची चटणी आज्जीची एक वेगळी recipe ,बर्याच चटण्या करायची त्यातील एक :

अख्खा कांदा गॅसवर भाजायचा एकीकडे ,दुसरीकडे कढल्यात छोट्या पाव चमचा तेल घेणे त्यात 10-12 मिर्याचे दाणे ,आणि लाल मिरच्या आवडीनुसार मी 7-8 घेतल्यात त्या परतवून घेणे , मग mixer वर भाजलेला कांदा सोलून अर्थात् ,परतलेल्या लाल मिरच्या आणि मिरं, ओला खवलेला नारळ ,चिंच चवीनुसार ,साखर ,मीठ असं खरबरीत वाटणे ,,खाताना त्यावर कच्चं तेल घेणे .कशाबरोबरही भन्नाट लागते ही चटणी .कांदा असल्याने सणावार आणि कार्य सोडून एरवी ही चटणी आज्जी करायची कधी कधी ,विशेषतः श्रमपरिहाराच्या जेवणाच्या  वेळी .आज मी माझा श्रमपरिहार दुपारच्या जेवणाला ही चटणी ,उडीद डांगर ,नाचणी भाकरी ,आधी केलेला मिरची आवळ्याचा ठेचा ,मी केलेला मुरांबा ( मला काही बाही लागतं गोड पानात अधे मधे ) आणि ताक असं करून केला .भाजीला दिला डच्चू आणि तोंडी लावणीच 2,3 प्रकारची घेऊन साजरा केला नवरात्री नंतरचा श्रमपरिहार आणि रूचीपालट ,वर म्हटल्या प्रमाणे तोंडीलावण्याच्या power ला underestimate न करता .

 

Janhavi Prashant Marathe is a member of the Angat Pangat Facebook Group.

No Comments Yet

Leave a Reply

Your email address will not be published.