रंग

नुकताच घरात रंगीत टीव्ही आला होता. अगदी काळ्या-करड्या रांगांमधून अचानक इंद्रधनुष्यात पडल्यासारखं वाटायचं तेव्हा. विविध कार्यक्रम होते. फक्त दूरदर्शनच होतं, तो काळ बदलत होता एव्हाना. संजीव कपूर नामक व्यक्ती सुंदर सुंदर पदार्थ करून दाखवे. तितकाच सुरेख बोलतही असे. स्वयंपाकातही कला असते हे मला तरी
ह्या व्यक्तीनेच शिकवलं. मग मी आरशासमोर उभी राहून ती नक्कल करे. अदार्थांपेक्षा कांकणभर जास्तच मला त्या स्वयंपाक घरातली काचेची भांडी, ते नाजूक हाताळणं आवडे.

पुढे आर्टसकूलला गेल्यावर रंग हा आयुष्याचा, जगण्याचा अति महत्त्वाचा घटक झाले. त्या नंतर तर हे असे कार्यक्रम मी त्या भांड्यांसाठी अधिक पाहिले.

मग पुढे तीच भांडी, माणसं चित्रामध्ये येऊ लागली. इथे ह्या चित्रातही दोन वयाच्या, तरीही त्यांच्या पेहराव्यातून त्यांच्या कलेची आवड दिसते. “स्वयंपाक करताना आपणही टवटवीत दिसावं, थोडासा जीव त्या पदार्थात घालावा,” असं आज्जू म्हणायची…हे चित्र खास तिच्यासाठी जिने चव मनाशी जोडली.

 

Shubhangi Chetan is a visual artist and author, and is a member of the Angat Pangat Facebook Group. 

No Comments Yet

Leave a Reply

Your email address will not be published.