सांगोसांगी वांगी, वांग्याचं भरीत. भरतात घातले पोहे, चवीबद्दल शंकाच नोहे!

कृष्णाकाठची वांगी काल मुंबईत मिळाली नवर्याला आमच्या बोरिवलीच्या मार्केट मधे.मग काय धीर धरणार ,आला घेऊन ,काही छानंसं कर आणि कारणी  लाव  म्हणाला.आज आत्ता यायला उशीर झाला त्याला office मधून आणि विशेष भूक नाहीये म्हणाला थोडंसंचं काहीतरी कर .मला ती वांगी खुणावत होती ,म्हटलं भरीत पोहे करू ? मोठ्ठा हो आला आणि लगेच भरीत करायला घेतलं ,वांग्याना तेलाचा हात लावला ,भाजली छान ,लहान आणि कृष्णाकाठची असल्याने लगेच भाजली गेली .सालं वेगळी केली ,कांदा घातला जरा जाडसरच चिरला ,हिरवी मिरची,दाण्याचं कूट,ओला नारळ,मीठ घातलं आणि मग नवरोजींना विचारलं अरे चिंचं गुळाचं करू का दह्यातलं ,तशी कसंही म्हणाला मग मी चिंचेचा कोळ आणि गूळ घातला .वरून खमंग सुक्या मिरच्या हिंगं वाईच जास्तं घालून फोडणी दिली आणि त्यात जाड पोहे 5,7 मिनिटं घालून ठेवले आणि लगेच नवर्यास वाढले .त्या 5 मिनिटं मुरण्याच्या वेळात फोटो काढून घेतले .( इथे कोरडेच पोहे घ्यायचे आणि जाड पोहेच ,भिजवायचे नाहीत पोहे )

Bhareet Pohe

आता म्हणाल सांगो सांगी वांगी का ? तर त्याचं असं की मी वांगी पोहे खाल्ले होते पण त्यात फोडी करून फोडणीत वांगी घालून मग त्यात भिजवलेले जाड पोहे घालतात .आमच्या इथे एक काकू राहतात त्यांचं माहेर उरण ,रायगड जिल्हा त्यांनी मला भरीत पोह्या विषयी सांगितलं ,म्हणाल्या करून बघ ,दह्यातलं वा चिंचं गुळाचं कसलंही नेहमी करतो तसं भरीत आणित्यात पोहे जाडचं हं आणि कोरडेच घालायचे ,मी करून बघितलं ,ही गोष्टं 15,16 वर्षांपूरवीची ,तेव्हा पासून कित्येकदा मी भरीत पोहे करते ,आमच्याकडे सगळ्यांना आवडतात.पोटभरीचे ही ,आणि चवीष्टंही ,तर आमच्या सोसायटी मधल्या दंडवते काकूंनी सांगितलेली recipe म्हणून सांगोसांगी वागी ,,नाहीतर मी त्या आधी भरतात पोहे हे combo खाल्लं नव्हतं .
आमच्याकडे दिवाळीच्या पहिल्या दिवशी 5 प्रकारचे पोहे करतात ,कोळ पोहे,दडपो पोहे,बटाटे पोहे,गुळ पोहे,दही पोहे .अर्थात सणावारी कांदा ,लसूण नाही ,म्हणून कांदे पोहे नाही आणि वांगंही निषिध्द ,म्हणून वांगी पोहे ही नाही पण एरवी आवड म्हणून करतेच मी ,वांगी पोहे ही आणि भरीत पोहे ही .कांदे पोहे तर होतातचं .पालीला आमच्याकडे पोह्यांच्या गिरणी होत्या ,आता कमी झाल्या तिथे मी खूप वर्षांपूरवी गिरणीवर जाऊन  हळद लावलेले पोहे ,कोथिंबीर लावलेले पोहे ,आलं लावलेले पोहे गरम गरम खाल्ले आहेत ,माझ्या लग्नानंतर ,माझ्या चुलत सासुबाईंनी (जयश्री काकूंनी )मला खायला घातले होते ,त्या आधी मी असे पोहे नव्हते खाल्ले कधी ,काय लागतात म्हणून सांगू ,अफलातून ,ओंजळीत घ्यायचे असे विविध स्वाद लावलेले   पोहे आणि हात भाजत असला तरी ह्या हातावरून त्या हातावर घेत ,फुंकर मारत खायचे ,,अहाहा ,नवीन लग्नं झालं होतं माझं ,पालीत गेल्यावर जोडीने फिरायला जायचो संध्याकाळी आणि गिरणीवर जाऊन ,माझ्या हळदीच्या पिवळ्या हातात हळद लावलेले गरम गरम पोहे नवरा फुंकर मारून मला खायला घालायचा ,कधी कोथिंबीर लावलेले ,कधी आलं लावलेले गिरणीतले पोहे ,,,अहाहा ,,,so romantic ना .प्रत्येक वेळेस समुद्र किनारा वा candle light dinner च romantic असं नसतं हे 24 वर्षांपूरवी गिरणीतल्या गरम गरम विभिन्न स्वादाच्या पोह्यांनी मला शिकवलं .love marriage असल्याने typical कांदे पोहे program झालाच नव्हता पण तरी देखील लग्नानंतरची ही पोह्याची गोड आठवण आहे गाठीशी .

आज भरीत पोह्यांच्या निमित्ताने आठवलं सारं ,दिवाळीतील माझ्या माहेरी ,आजोळी होणारे पाच प्रकारचे पोहे कालवतानाची आज्जी ,मामी ही आठवल्या आणि त्या सगळ्या सुखद आठवणींनी मन भरून आलं .

Janhavi Prashant Marathe is a member of the Angat Pangat Facebook Group.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.