तांदुळाची खीर भातुकलीच्या चुलीवरची

Bhatuklichi Kheer

भातुकली हा लहानपणापासून माझ्या अतिशय जीव्हाळ्याचा विषय. कित्ती दुपारी घराच्या मागच्या अंगणात सावलीत भातुकली आणि बाहुलीच्या लग्नात घालवल्या असतील त्याला गिणतीच नाहीये.
अतुल पण लहानपणी चूल बनवायचा, म्हणाला की तन्मय च्या साठी छोटी चूल करूया आणि त्यावर खीर करूया. ही त्याच्या लहानपणीची आठवण. लगेच अतुलने माती चाळून भिजवून चूल केली. ती काल वाळत ठेवली.
आज सकाळी ती चूल वाळली होती. मग त्यात छोटी छोटी लाकडं घालून ती पेटवली. त्यावर तांदूळ आणि पाणी एका छोट्या स्टीलच्या पातेल्यात घालून शिजवले. दूध साखर आणि वेलची पूड घालून खीर तयार.

आजीने तन्मयला बुड बुड घागरीची गोष्ट सांगीतल्यापासून चूल काय असते असं तन्मय सारखं विचारत होता. चूल बनवून त्याचं प्रात्यक्षिकच दिलं अतुल ने त्याला. खीर मात्र आम्ही सर्वांनी चाखली हो, गोष्टीतल्या मांजरीसारखी बुड बुड घागरीची वेळ नाही आली.

चुलीतला विस्तव चालू ठेवणे हे काम करायला अत्यंत मजा आली. तन्मय ची भातुकली करता करता ती आमची कधी झाली हे कळलं पण नाही. इंग्लंड मधली सोनेरी सकाळ अगदी मस्त मजेत गेली आजची.

 

Aditi Hiranwar is a member of the Angat Pangat Facebook Group.

Chulivarchi Kheer
No Comments Yet

Leave a Reply

Your email address will not be published.