उपवासाचा शिरा (Upvaas Sheera)

**Dr. Pallavi Prasad Bartake is an enthusiastic member on Angat Pangat, and shares simple yet delectable recipes for everyday.**

साहित्य :

  • वरीचा तांदूळ 1 वाटी
  • साखर 1 वाटी
  • साजूक तूप अर्धी वाटी
  • दूध 2 वाट्या  
  • पिकलेले केळे 1
  • वेलची पावडर 1 चमचा
  • काजू बदाम तुकडे, मनुके

 

कृती:

सर्वप्रथम वरीचा तांदूळ मिक्सर मधून बारीक करून घ्यावा (पिठी करू नये).

एका नॉनस्टिक भांड्यात साजूक तूप घेवून त्यात हा वरीचा तांदूळ चांगला परतवून घ्यावा.

मग त्यात काजू बदाम तुकडे, मनुके अणि पिकलेले केळे कुस्करून घालून चांगले ढवळावे.

बाजूने तूप सुटू लागले की त्यात गरम केलेले दूध अणि साखर घालावी.

झाकण ठेवून 5 मिनिटे वाफ येऊ द्यावी.

मग गॅस बंद करावा.

वेलची पावडर घालून पुन्हा एकदा चांगले ढवळावे.

मस्तपैकी मुद पाडून सर्व्ह करावा.

लज्जतदार उपवास शिरा वदनी कवळ घेण्यासाठी तय्यार.

 

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.