Tikhat Mithachya Purya (Spiced Puris)

**Mrinmayee Ranade‘s daughter has captured the process of her mother making a batch of Tikhat Mithachya Purya for her.**
रविवारची सकाळ. नाश्त्याला काहीतरी वेगळं खायची इच्छाही आणि जरा उसंतही. त्या दिवशी तिखटमिठाच्या पुऱ्या करायचं ठरलं. दोन वाट्या कणीक घेतली. आणि बेसन, तांदळाचं पीठ, काॅर्नफ्लोर, नाचणी व ज्वारीचं पीठ मिळून दोन वाट्या असं फूड प्रोसेसरमध्ये ओतलं. पुऱ्यांची कणीक मी नेहमी त्यातच मळते कारण पुऱ्यांना आवश्यक तेवढी घट्ट कणीक हाताने भिजवणं जरा कठीणच असतं. या पिठात तीनचार चमचे कसुरी मेथी घातली. सातआठ लसणीच्या पाकळ्या ठेचून घातल्या. चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घातलं. हळद आणि दोन चमचे ओवा घातला. दोनतीन चमचे तेल घातलं. आणि थोडं थोडं पाणी घालत कणीक भिजवली. १५ मिनिटं झाकून ठेवली. नंतर तेल लावून जरा मळून घेतली आणि लाट्या केल्या. गरम तेलात तळून काढल्या.

त्याच सुमारास अंगतपंगतवर दिवाळी अंकासाठी फोटो पाठवण्याचं आवाहन वाचलं होतं. मग लेकीला म्हटलं फोटो काढ. तिने तिच्या मोटो जी फोनवरच हे फोटो काढले आहेत. लाट्या, लाटलेली पुरी, कढईतली पुरी आणि तयार टम्म फुगलेल्या पुऱ्या असं सगळं एका फ्रेममध्ये घेतल्याबद्दल गार्गीचे आभारच मानायला हवेत.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.