Bittya: A Vidarbha Delicacy

**Vandan Bhojane is a silent member of Angat Pangat but offers valuable insights into the world of Khandeshi cuisine.**
विदर्भ स्पेशल
बिट्ट्या +आलू वांगे + साधे वरण
बिट्ट्या – बाटी / रोडगे यांच्यातला एक प्रकार ज्याला आमच्या विदर्भामध्ये पानगे पण म्हणतात .
रेसिपी
बिट्ट्या –
 १.कणिक चांगल्या प्रकारे मळून घ्या ,
 २. नंतर त्याच्या छोट्या पासून मोठ्या पर्यंत पोळ्या लाटून घ्या आणि एकावर एक ठेऊन बांधून घ्या .
 ३. तयार केलेला गोळा कुकर मध्ये १२-२० मिनिटे शिजवून घ्या .
 ४.नंतर त्या गोळ्याला ४ भागात कापून घ्या .
 ५.कापलेले गोळे तेलामध्ये तळून घ्या
आलू -वांगे
 १. सर्वप्रथम आलू वांगे मोठ्या आकारामध्ये चिरून पाण्यामध्ये ठेवा
 २. वाटण बनवायसाठी – खडा मसाला + खोबरे + कांदा तेलामध्ये हलकासा तळून घ्या आणि हे वाटण मिक्सर मध्ये बारीक करून घ्या
 ३. तेल गरम करून त्यामध्ये मोहरी ,जिरे आणि कांदा घाला नंतर अद्रक लसूण ची पेस्ट घाला ,थोडावेळ झाल्यावर त्यामध्ये वाटण घालून घ्या , वाटण थोडे शिजल्यावर (तेल सोडू लागल्यावर) त्यामध्ये तिखट ,हळद धने पावडर आणि मीठ घाला .
 ४.नंतर त्यामध्ये आलू , टमाटे आणि वांगे टाका . झाकण ठेऊन कमी पॉवर वर १५ मिनिटे ठेवा नंतर त्यामध्ये गरम पाणी घालून उकळून घ्या.

Also see

No Comments Yet

Leave a Reply

Your email address will not be published.