गुळाची पोळी (Jaggery stuffed breads)

**Sulabha Bhide‘s Gulachi Poli recipe debuted on Angat Pangat earlier this year and has been made by hundred of people since!**

 

ही पाककृती पुण्याच्या सिंधुताई साठे यांची आहे.

साहित्य:
१/२ कि गूळ
१ वाटी तीळ भाजून ,कुटून पूड
१ वाटी डाळीच पीठ,पीठ भाजण्यास ३ टे.स्पून तेल
१/२ टी स्पून वा आवडीप्रमाणे वेलदोडा पूड

कणीक भिजवण्यास:
४ वाट्या कणीक
१।। वाटी बारीक रवा
१  वाटी मैदा
१/२ वाटी डाळीचे पीठ
१/२ वाटी तांदूळाची पीठी
१ टीस्पून मीठ
१/२ वाटी कडकडीत तेलाचे मोहन

गुळ तयार करणे —
बटाट्याच्या किसणीने तेलाचा हात लावून गूळ किसावा.
बेसन बदामी रंगावर तेलावर भाजून गार करावे.
गूळ,बेसन,तीळपूड,वेलदोडापूड,सर्व एकत्र करून ” गोळा ” करावा.

पोळी करणे —
मैदा,डाळीचे पीठ,रवा,पीठी,कणीक,तेल,मीठ,सर्व एकत्र करुन ; पुरीच्या कणकेसारखे भिजवून २ तास ठेवावी.
नंतर दोन भाग कणीक,एक भाग गुळ (तयार केलेला ) घेऊन ; तिन्ही सारखे लाटून दोन कणकेच्या पाऱ्यात -एक गुळाची पारी ठेवावी. कडा न मिटवतां  पिठी लावून लाटावी.

चांगल्या तापलेल्या तव्यावरदोन्ही बाजूने भाजून , पोळ्या कागदावर गार होण्यासाठी पसराव्यात.

वरील पाककृती मा. सिंधुताईं द्यायच्या व करून दाखवायच्या त्याप्रमाणे आहे.याप्रमाणे केल्यास उत्तम होतात असा अनुभव आहे.
मी त्यात माझ्यापुरते काही बदल केले आहेत ते असे…
मला भरपूर गूळ असलेली पोळी आवडते,म्हणून गुळाच्या गोळीपेक्षा कणकेच्या गोळ्या लहान घेते.

.पोळपाटाकडील पारीची गोळी वरीलपेक्षा थोडीशी मोठी घेते.

महत्वाचे आणि माझ्या अनुभवातून निष्कर्ष असा कि गूळ जेवढा मऊ तितकीच कणिक मऊ असावी…

म्हणून आधी गूळ करून त्याचा मऊपणा पाहून त्याप्रमाणे कणिक भिजवावी, म्हणजे गूळ पोळीत एकसारखा पसरतो.

Also see

No Comments Yet

Leave a Reply

Your email address will not be published.